Homeऑटोमोबाईलहुंडईचीक्रेटा इलेक्ट्रीक कार लवकरच लॉंच होणार, काय आहेत वैशिष्ट्ये पाहा

हुंडईचीक्रेटा इलेक्ट्रीक कार लवकरच लॉंच होणार, काय आहेत वैशिष्ट्ये पाहा

हुंडई क्रेटा इलेक्ट्रीक कार बाबत मोठी अपडेट आलेली आहे. हुंडई कंपनीची मोस्ट अव्हेटेड क्रेटा इलेक्ट्रीक सुव्ह कारचे भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये अनावरण होणार आहे. हुंडई मोटर इंडियाचे सीओ तरुण गर्ग यांनी या संदर्भात सांगितले की क्रेटा इलेक्ट्रीक कार जानेवारी 2025 मध्ये भरणाऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये सादर केली जाणार आहे. यावेळी प्रवाशांसाठी बाजारात उतरविण्यात येणाऱ्या या ईलेक्ट्रीक कारची पहिली झलक प्रवाशांना पाहायाला मिळणार आहे.

हुंडई क्रेटा ईलेक्ट्रीक कार अनेकदा टेस्टींग दरम्यान नजरेस पडली आहे. इंटरनेटवर नव्या इलेक्ट्रीक कारची लेटेस्ट स्पाई इमेज पाहायला मिळत आहे. या इमेजनुसार हुंडईने आपल्या क्रेटाच्या इलेक्ट्रीक व्हर्जनला नवीन रुपात सादर करेल असे म्हटले जात आहे. इलेक्ट्रीक कारमुळे याला अधिक सुरक्षिततेसाठी खास क्लोज्ड फ्रंट ग्रिल असणार आहे. आणि एअरो डायनामिक एलॉय व्हील देण्यात आली आहे. इलेक्ट्रीक कार अपडेटेड रिअर बम्पर मिळणार असून यात नवीन क्रेटा ईव्ही बॅज देखील असणार आहे.
क्रेटाचे धमाल फिचर्स
हुंडईने इंधनावर धावणाऱ्या  क्रेटा कारच्या एवजी अल्काझरकडून प्रेरणा घेऊन केबिनला अधिक चांगले केले आहे. नवीन क्रेटा ईलेक्ट्रीक कारमध्ये ड्रायव्हर सिलेक्ट्रर सह एक नवा थ्री- स्पोक स्टीअरिंग व्हील दिले जाणार आहे. सेंट्रल कंसोलमध्ये डबल कपहोल्डर्स, ऑटो होल्ड आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेससाठी कंट्रोल बटण, ३६० डिग्री कॅमेरा आणि फ्रंट वेंटिलेटेड सीटसह परिचित लेआऊट पाहायला मिळेल, या वायरलेस चार्जर, तसेच ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सेट-अप अल्काझर सारखाच असणार आहे. क्रेटात इंफोटेनमेंट सिस्टम आणि ड्राइव्हर कंसोलसाठी डबल १०.२५ इंचा डिस्प्ले असेल. क्रेटा EV मध्ये लेव्हल २ ADAS, सहा एयरबॅग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, फ्रंट पार्किंग सेंसर सारखे अनेक फीचर असतील.

हे सुद्धा वाचा

पाचशे किमीपर्यंत रेंज
क्रेटा इलेक्ट्रीकमध्ये ४५ kWh क्षमतेची बॅटरी असेल. सिंगल चार्ज केल्यानंतर ही कार ५०० किमीपर्यंत रेंज देण्यासाठी सक्षम असेल. टाटा कर्व्हमध्ये एंट्री-लेव्हल वेरिएंटमध्ये समान कॅपिसिटीचा बॅटरी सेटअप असतो. दूसरीकडे MG ZS EV मध्ये ५०.३ kWh कॅपिसिटीची बॅटरी आहे. तसेच आगामी मारुती सुझुकी ई – विटारा देखील दोन बॅटरी पर्याय असलेल्या इलेक्ट्रीक कार बाजारात येणार आहे.

Source link

Must Read

spot_img